मुख्याध्यापकांचा संदेश

शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.शिक्षण महात्मा गांधीच्या मते व्यक्तीच्या अंर्त व बाह्य स्वरुपास जे बदलते ते म्हणजे शिक्षण.सध्या दोन प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते ते म्हणजे औपचारिक व अनौपचारिक तत्व व त्याच्या मतानुसार व्यक्तीच्या अंर्तबाह्य स्वरुपास बदलते ते शिक्षण या मतास दुजोरा देत म.टे.ए.सोसायटीच्या नवीन प्राथमिक शाळा(मराठी माध्यम) येथे आम्ही विद्यार्थ्यांस सर्वांगीण विकासाच्या दॄष्टीने तसेच विद्यार्थी हा सुशिक्षित बनण्याबरोबरच तो सुजाण नागरिक कसा होईल या दृष्टीने शाळा प्रयत्न करीत आहे. सध्याच्या २१ व्या शतकामध्ये आपली “मराठी भाषा” कोठेतरी लोप  पावत चालली आहे अशी भिती नव्हे तर सत्य जाणवत असल्यामुळे शाळेने दि.०१/०९/२०१५ रोजी सांगली मराठी सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली असून या मंडळार्तगत दरमहा एक कार्यक्रम आयोजित केला जातो.या कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेची गोडी प्रेक्षकास विद्यार्थ्यास अनुभवास मिळते विद्यार्थ्याना शिक्षणाबरोबरच देशाचे भावी कुशल नागरिक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कार करणारी शाळा म्हणजे म.टे.ए.सोसायटीची नवीन प्राथमिक शाळा(मराठी माध्यम) ही शाळा.