महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी इतिहास :-

सन १९४५ साली,कै.धोंडो कृष्ण उर्फ धोंडूमामा साठे यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील देशाची प्रशिक्षित तत्रंज्ञ ओळखून महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची पुणे येथे स्थापना केली. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेची गरज ओळखून त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र या नामांकित बॅंकेची स्थापना केली.सन १९४७ साली म.टे.ए.सोसायटीने सांगली येथे न्यू इंजिनिअरिंग कॉलेज या नावे देशातील पहिल्या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली.सन १९५६ साली या महाविद्यालयाचे म.टे.ए.सोसायटीचे “वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग” असे नामकरण करण्यात आले हे महाविद्यालय सध्या जागतिक स्तरावरील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.

                म.टे.ए.सोसायटीने पुणे येथे महाराष्ट्रातील अग्रगण्य असे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज याच बरोबर सुसज्ज हॉस्पिटल, हॉस्पिटल मॅनेजमेंटचे कोर्सेस, मुला – मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारणी तसेच इतरही शैक्षणिक उपक्रम राबविले असून,सध्या शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते.

                सन २०१३ साली म.टे.ए.सोसायटीने विश्रामबाग,सांगली येथे शासनमान्यता प्राप्त स्वयं-अर्थसहाय्यीत तत्वावर नवीन प्राथमिक शाळा (मराठी माध्यम) ची सुरुवात केली आहे. अल्पावधीतच या शाळा सांगली परिसरामध्ये नावारुपास आल्या आहेत व या शाळा भव्य, सुसज्ज अशा इमारतीत सुरु आहेत."