उपक्रम

 • विविध प्रकारची स्पर्धा/खेळ :-

  आमच्या शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा,खेळ घेतले जातात उदा.कबड्डी खो-खो,दोरी उड्या,फूटबॉल,सूर्य नमस्कार,अशा विविध प्रकारच्या कलागुणांना वाव दिला जातो.

  पारंपारिक सण :-

  आपली संस्कृती,आचार,विचार पध्दती यांचे सर्वश्रुत ज्ञान विद्यार्थ्यांना माहित व्हावे यासाठी शाळेत विविध प्रकारचे पारंपारिक सण साजरे केले जातात व त्यासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.

  अभ्यासेत्तर उपक्रम :-

  विविध पाठांतर स्पर्धा, विविध स्पर्धा परिक्षा (B.D.S) इ.स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले जाते. तसेच विविध कलाकृती मातकाम (पणत्या तयार करणे) भेटकार्ड तयार करणे इ.विविध कलाकृती विद्यार्थ्याच्या सृजन शिलतेस वाव देण्यासाठी शाळेत उपक्रम राबविले जातात. तसेच शालेय वार्षिक स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव दिला जातो.तसेच वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमातून ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले त्या विद्यार्थ्यांस पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते.